हरी ॐ
योगदास, श्री. जय गणेश जोशी यांचे बालपण चिपळूण तालुक्यातील परशुराम गावी गेले. बालपणापासूनच त्यांना अध्यात्माचे धडे त्यांच्या वडिलांकडून मिळाले. देव म्हणजे नेमके काय आहे याची कल्पना त्यांना लहानपणापासूनच मिळाली.
शालेय शिक्षण चिपळूणला झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला आले. पुण्यात काही वर्ष नोकरी करून ते पुढील काही वर्ष नोकरीनिमित्त वेस्ट आफ्रिकेला गेले. तेथेही आफ्रिकेच्या जंगलात व समुद्रकिनारी त्यांची ओम्-कार साधना व ध्यान चालूच होते. तेथेच त्यांना साक्षात्कार झाला.
नंतर त्यांनी पुढे पुण्यात येऊन योगेश्वर आज्ञेप्रमाणे आत्मज्ञानाचा प्रसार हेच जीवितकार्य आरंभले. साधारण गेले 24 वर्षे ते अध्यात्मप्रसाराचे कार्य करत आहेत. त्यात त्यांनी विविध शिबिरे (योगासने, प्राणायाम, ओम्-कार जप, ध्यान, हस्तमुद्रा), अध्यात्मिक कार्य प्रवचने, पुस्तक लिखाण हे कार्य सुरू आहे. त्यांची 60 हून जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
फेब्रुवारी 2022 मध्ये ते 75 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या या थोर आध्यात्मिक कार्यापुढे नतमस्तक होऊन साधक मंडळींनी त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त ही वेबसाइट तयार करण्याचे ठरविले आहे.
योगदासांना सर्व साधक मंडळी तर्फे कोटी कोटी प्रणाम.