हरी ॐ
हरी ॐ
सद्गुरू लाभले योगदास । मज भाग्य आले उदयांस । जीवननौका योग्य मार्गावर । मस्तक सदा गुरुचरणांवर ॥१॥
कर्मज्ञान भक्ति मुरली | स्वरूपाची ओळख पटली ।
तेणे निरंजनयात्रा सुकर । मस्तक सदा गुरुचरणांवर ।।२।।
गुरुसंगे मिळे आत्मज्ञान । जे देई पूर्ण समाधान। सफल झाला माझा संसार मस्तक सदा गुरुचरणांवर ॥३॥